Share

Devendra Fadnavis | “… अशातच एक मर्द मराठा तयार झाला”; देवेंद्र फडणवीसांनी केले एकनाथ शिंदेंचे कौतुक

Published On: 

🕒 1 min read

नवी मुंबई : भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. यावेळी बोलता त्यांनी विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील इतर नेत्यांनी नेहमीच हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला होता. “आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत”, असे आशयाची वक्तव्य अनेक नेत्यांनी केली होती. हाच मुद्दा फडणवीस यांनी आजच्या त्यांच्या भाषणात उचलून धरला होता. तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक देखील केले आहे.

याच संदर्भात त्यांनी ट्विट देखील केले आहेत. ट्विटमध्ये फडणवीस म्हणतात कि, “रोज तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागायचा. वीर सावरकरांचा अपमान, दाऊदशी संबंधित लोकांचा बचाव अशा वातावरणात एक मर्द मराठा तयार झाला आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी एकनाथ शिंदे यांनी हिंमत केली. मी त्यांचे अभिनंदन करतो.”

देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये लिहले आहे कि, “राज्यात आज खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी सरकार आले आहे. आमचे हिंदुत्व संकुचित नाही तर व्यापक आहे. जात, पूजा पद्धती यांच्या पलिकडे आमचे हिंदुत्व आहे. सर्वांना समान न्याय देताना लांगूलचालन मात्र आम्हाला मान्य नाही”. तसेच पुढे ते असेही म्हणाले कि, ” होय, आम्हीच हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी लढणार, मराठीच्या रक्षणासाठी हे सरकार आलेय. प्रत्येक मराठी माणसाच्या रक्षणासाठी हे सरकार आलेय. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी हे सरकार आलेय”.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!