🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस अनेक मोठे गौप्यस्फोट होतायत. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाला कोणाला स्थान मिळणार याबाबत मोठ्या चर्चा सुरु आहेत. सरकार स्थापन होऊन आज १४ दिवस झाले. तरीही आजून मंत्रिमंडळ जाहीर झालं नाही. तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेची नोटिसीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 18 जुलैच्या राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यात खातेवाटप होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांवरील कारवाईचा मुद्दा असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध यांनी सावध भूमिका घेतली आहे. कारण 19 तारखेला भाजपचे केवळ चार मंत्र्यांचाच शपथविधी होईल. तसंच शिंदे गटातीलही केवळ चारच मंत्री शपथ घेतील अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे सरकारमध्ये 8 ते 10 मंत्र्यांना 19 तारखेला शपथ दिली जाऊ शकते, अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, 12 दिवस झाले तरी सरकार अस्तित्वात नाही. कारण दोन लोकांचं सरकार हे बेकायदेशीर आहे. आमदार अपात्रं ठरू शकतात. त्यांना शपथ देणं हा राजद्रोह आहे. हे घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजकीय भ्रष्टाचार आहे. त्याची भीती असल्याने त्यांना रोखलं असावं. राज्यपालांनी कोणतंही घटनाद्रोही कृत्य करू नये, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | शिवसेना अशा अनेक प्रसंगांतून बाहेर पडली आहे – संजय राऊत
- Uddhav Thackeray : लढाईला तयार राहा, शिवसेना मजबूत हे दाखवून द्या; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
- Sadabhau Khot | “…मंत्री मंडळात वाडप्यांची गरज नाही” – सदाभाऊ खोत
- India vs England, 2nd ODI | रोहित शर्माने टॉस जिंकला, भारत करेल प्रथम गोलंदाजी
- Navneet Rana : ठाकरे सरकारला जमलं नाही ते शिंदेंनी करून दाखवलं; नवनीत राणांची सडकून टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
