🕒 1 min read
मुंबई : सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ सगळीकडे जोरदार पाऊस सुरु आहे. त्यातच राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आलं आहे. तसेच नवनिर्वाचत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. विदर्भात गडचिरोली मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळेच पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गडचिरोलीमध्ये तीन दिवसांचा रेड अलर्ट जारी केला आहे. पूर परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी गडचिरोलीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिला विदर्भ दौरा आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. आता ते मुख्यमंत्री म्हणून गडचिरोलीचा दौरा करणार आहे.
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयातून रवाना झाल्याची माहिती आहे. यामुळेच दुपारची एमएमआरडीएची बैठक रद्द करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दिवसेंदिवस पावसामध्ये वाढ होत असल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करुन तेथील नागरिकांच्या व्यथा ते जाणून घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
