Share

Sadabhau Khot | “…मंत्री मंडळात वाडप्यांची गरज नाही” – सदाभाऊ खोत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सध्या शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट आले आहे. यातच सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. तसेच शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये मतदानाचा हक्क दिल्याने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

“जनतेच्या हिताचे निर्णय या दोन माणसांनी घेतले. चाळीस मंत्री हे मंत्री मंडळात असतात. पण आता या वाडप्यांची गरज दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीच चांगले निर्णय घेतले आहेत. हे या निर्णयातून समजून येत आहे. त्यामुळे ही दोन माणसं सुद्धा महाराष्ट्राला पोट भर जेवायला वाढू शकतात”, या शब्दात सदाभाऊ खोत यांनी शिंदे आणि फडणवीस यांचे कौतुक केले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!