🕒 1 min read
India vs England | भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका (India vs England ODI) सुरू झाली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील संघाने मंगळवारी (१२ जुलै) पहिला एकदिवसीय सामना जिंकून ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता दुसरा वनडे लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. टीम इंडिया आपली गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून टी-20 प्रमाणे एकदिवसीय मालिकाही आपल्या नावावर करता येईल. दरम्यान रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही वर्षांत इंग्लंडने आपल्या आक्रमक शैलीने एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे. 2019 च्या विश्वचषकात इंग्लंडला हा फायदा मिळाला. जेव्हा त्यांनी प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविजेतेपद पटकावले. मात्र, मर्यादित षटकांमध्ये संघाचा नवनियुक्त कर्णधार जॉस बटलर पुनरागमन करेल, अशी आशा आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर त्याने पुढील सामन्यात आपल्या संघाविरुद्ध दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.
इंग्लंड संघ: जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, रीस टोपले, मॅथ्यू पार्किन्सन, डेव्हिड विली.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रशांत कृष्णा आणि युझवेंद्र चहल.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | “कोकणात आल्यानंतर शरद पवारांच्या गाडीत बसून…” ; जयंत पाटलांचा केसरकरांवर घणाघात
- Sanjay Raut : आमच्या खासदारांचा आकडा जसाच्या तसा राहील; संजय राऊतांचा उदय सामंतांवर पलटवार
- Pratap Sarnaik | “उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागताला आले नाही…”- प्रताप सरनाईक
- Jayant Patil | “शरद पवार यांनी शिवसेना फोडली नाही”; जयंत पाटलांनी केले पवारांवरील आरोपांचे खंडन
- Chandrakant Khaire : “मंत्रिमंडळ स्थापनेनंतर अनेक आमदार ‘मातोश्री’वर डोकं टेकवतील”; चंद्रकांत खैरेंचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
