🕒 1 min read
Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला मात्र मोठी गळती लागली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकत वाढू लागली आहे. तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिवसेंदिवस धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आमदारांनंतर आता खासदार देखील शिंदे गटाच्या मार्गावर असल्याच्या वारंवार बातम्या माध्यमांतून समोर येत आहेत. तसेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबवली आणि मीरा भाईंदर या महानगर पालिकेतील नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत.
मात्र दुसरीकडे पुन्हा नव्याने शिवसेना उभी करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे. लढाईसाठी तयार राहा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. कुणी गेले आहे, याचा विचार न करता या निवडणुकीत शिवसेना मजूबत असल्याचे दाखवून द्या´ असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे. मातोश्रीवर बोलावलेल्या जिल्हाप्रमुख आणि पदाधिका-यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. नगरपरिषद, नगरपालिका निवडणूक तयारीसाठी बोलवलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे देखील सध्या मैदानात उतरले आहेत. आमदारांनी बंड पुकारल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्यभर निष्ठा यात्रा मोहीम सुरु केली आहे. तसेच तळागाळात जावून पुन्हा एकदा नव्याने शिवसेना उभी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Sadabhau Khot | “…मंत्री मंडळात वाडप्यांची गरज नाही” – सदाभाऊ खोत
- India vs England, 2nd ODI | रोहित शर्माने टॉस जिंकला, भारत करेल प्रथम गोलंदाजी
- Navneet Rana : ठाकरे सरकारला जमलं नाही ते शिंदेंनी करून दाखवलं; नवनीत राणांची सडकून टीका
- Jayant Patil | “कोकणात आल्यानंतर शरद पवारांच्या गाडीत बसून…” ; जयंत पाटलांचा केसरकरांवर घणाघात
- Sanjay Raut : आमच्या खासदारांचा आकडा जसाच्या तसा राहील; संजय राऊतांचा उदय सामंतांवर पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
