🕒 1 min read
चंद्रपूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या काल झालेल्या सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांना हिंदू या शब्दाची ऍलर्जी आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.
जर राज ठाकरेंनी अशी टीका केली आहे तर शरद पवारांनी याच उत्तर द्यावं, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले. तसेच पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा भूमिका बदलल्या असं म्हणत पवारांच्या भूमिका या ऋतूप्रमाणे बदलत असतात अशी टीका त्यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या:


