मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिला आहे. मशिदीवरील भोंगे काढले नाही तर येत्या ४ तारखेपासून मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवा, असा आदेशच राज ठाकरे यांनी औरंगाबाद सभेतून कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. एमआयएमचे प्रमुख असुउद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “राज ठाकरे यांचं भाषण हिंसा भडकावणारे आहे. त्याची पोलीस गंभीर दखल का घेत नाही ? महाराष्ट्र मोठा की व्यक्ती मोठी ? असा सवाल करत त्यांनी नवनीत राणा यांना अटक होऊ शकते तर राज ठाकरेंना का अटक होऊ शकत नाही? त्यांना तुरुंगात टाका. त्यांचं डोकं शांत होईल. असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला.
एक व्यक्ती औरंगाबादच्या एकतेला बाधा आणणार आहे का ? त्यांचं भाषण म्हंणजे हिंसा प्रवृत्त करणारं आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्या भावाविरोधात कारवाई करायची नाहीये. महाराष्ट्राची दिल्ली बनवायची आहे का? दुसरीकडे राष्ट्रवादी काय करत आहे. असा सवाल ओवेसी यांनी केला.
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राज्यात यांचच सरकार आहे. मुख्यमंत्र्यांचा घरासमोर कोणीतरी हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा देतात आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला जातो. मात्र मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावणाऱ्यांबाबत सरकार काहीच करत नाही. तेव्हा तुम्ही गप्प का होता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

