Share

IPL 2022 KKR vs RR : कोलकाताच्या श्रेयस अय्यरनं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात स्पर्धेतील ४७वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात कोलकाताचा कप्तान श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकाता संघ नऊपैकी तीन सामने जिंकून गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स नऊपैकी सहा सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. या मोसमातील दोन्ही संघांची ही दुसरी गाठ आहे.

कोलकाता नाइट रायडर्सला स्पर्धेतील चांगली सुरुवात कायम राखता आली नाही आणि या संघाने सलग पाच सामने गमावले आहेत. कर्णधार श्रेयस अय्यर वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला वरच्या फळीत छाप पाडता आलेली नाही. नितीश राणाला मधल्या फळीत इतर फलंदाजांची साथ मिळत नाहीये. व्यंकटेश अय्यरची फ्लॉप कामगिरी संघाला खूप त्रास देत आहे. गोलंदाजीत ताकद नाही आणि परिस्थिती इतकी बिकट आहे की, गेल्या सामन्यात श्रेयस अय्यर गोलंदाजी करताना दिसला होता. अशा स्थितीत प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेल्या केकेआरला आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागणार आहे.

राजस्थान रॉयल्सला त्यांच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. जोस बटलर वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला संघाच्या फलंदाजीत धावा करता आल्या नाहीत. कर्णधार संजू सॅमसनही बेजबाबदार शॉट खेळून बाद होत आहे. शिमरोन हेटमायरलाही शेवटच्या सामन्यात मधल्या फळीत संघर्ष करताना दिसला, पण तो चांगला खेळला आहे आणि त्याच्याकडून केकेआरविरुद्धही चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असेल. संघाच्या गोलंदाजी विभागाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून त्यांना फलंदाजांच्या पाठिंब्याची गरज आहे.

दोन्ही संघांची Playing 11

कोलकाता नाइट रायडर्स – आरोन फिंच, सुनील नरिन, श्रेयस अय्यर (कप्तान), बाबा इंद्रजीथ (यष्टीरक्षक), नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, उमेश यादव, टीम साऊदी, शिवम मावी.

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), करुण नायर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!