🕒 1 min read
मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बुस्टर सभेत बाबरी मशीद विषयावरुन शिवसेनेवर घणाघाती टीका केली. बाबरी मशीद पाडताना एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता. परंतु, बाबरी पाडताना मी उपस्थित होतो, बाबरी प्रकरणी 32 आरोपी भाजपमधील होते. त्यात शिवसेनेच्या एकाचाही समावेश नव्हता असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी भाजपला प्रत्युत्तर देत बाबरी मशीद पाडल्यानंतरची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती अशी विधानं केली. त्यावर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेला घेरलं आहे. ती लढाई भाजप, संघ आणि विश्व हिंदू परिषदेने लढली, असे शेलार यावेळी म्हणाले. त्याचबरोबर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींबरोबर तुमचा आईस्क्रीम खाण्याचा कार्यक्रम सुरु आहे, असा गंभीर आरोप त्यांनी शिवसेनेवर केला आहे.
बाबरी मशीद कोणी पाडली?
शिवसेना खासदार संजय राऊतांनी थेट भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा व्हिडिओ ट्विट करत पुरावा दिला आहे. संजय राऊतांनी बाबरी कोणी पाडली? असे कॅप्शन देत लालकृष्ण अडवाणींचा २९ डिसेंबर २००० रोजीचा व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओमध्ये बाबरी मशीद पाडण्याच्या विषयावर बोलताना अडवाणींनी मराठी भाषिकांचा उल्लेख केला आहे. त्यावरुन तिथे मराठी लोक म्हणजेच शिवसैनिक उपस्थित असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

