Share

भाजप कार्यालयाबाहेर राज ठाकरेंची गाडी?, चर्चांना उधाण! ; नक्की काय आहे प्रकरण?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज ठाकरे यांनी भाजपची सुपारी घेतल्याची टीका होत आहे. गेल्या तीन सभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर निशाना साधला आहे. भाजपबाबत त्यांनी सावध भूमिका घेतली. त्यांनतर भाजप-मनसे युतीच्या चर्चा देखील जोरदार रंगल्या आहेत. दरम्यान, मात्र राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची गाडी भाजप कार्यालयाबाहेर पाहून सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरे यांनी हिंदूत्वाची भूमिका घेतल्यानंतर मनसे भाजपची बी टीम असल्याची चर्चा होत होत आहे. राज ठाकरे भाजपच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीवर टीका करत आहेत, असा आरोप देखील त्यांच्यावर होत आहेत. तसेच राज ठाकरे यांना हे सर्व करण्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करत आहे,  अशा अनेक चर्चा सध्या महाराष्ट्रभर आहेत. अशा प्रकारच्या चर्चा सर्वत्र सुरू असताना शर्मिला ठाकरे यांची गाडी मुंबई येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर दिसून आल्यानंतर समाज माध्यमांवर चर्चेला उधाण आले आहे.

मर्सडीज या कंपनीची ही गाडी असून महाराष्ट्र. 46. जे. 9 (MH 46 J 0009) असा या गाडीचा क्रमांक आहे. आता शर्मिला ठाकरे यांची गाडी भाजप कार्यालयाच्या बाहेर कशी काय? असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित झाला असेल. ही गाडी भाजप कार्यालय बाहेर कोण घेऊन आलं? नक्की या गाडीतून कोण आले आहे? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आता निर्माण झाले असतील.

सत्यता काय आहे?

शर्मिला ठाकरे यांची गाडी भाजप कार्यालयाच्या बाहेर कशी यामुळे लोकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या. मात्र या मागची सत्यता काही वेगळी आहे. तर ही गाडी शर्मिला ठाकरे यांच्याकडून सतीश कोठावळे यांनी खरेदी केली आहे. सतीश कोठावळे ज्यांनी ही गाडी विकत घेतली आहे. त्यांनी ही गाडी भाजप कार्यालयाच्या समोर लावल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. त्यांनी ही गाडी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याकडून विकत घेतली असून आता ती गाडी सतीश कोठावळे यांच्या नावावरती करण्यासाठी आरटीओकडे कागदपत्रे दिली असल्याचे कोठावळे यांनी सांगितले. कोठावळे यांनी ही गाडी 14 एप्रिल रोजी खरेदी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!