Share

“तरुणांचे भविष्य उद्धवस्त करणारी…”, बाळासाहेब थोरात यांचा केंद्रावर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: अग्निपथ योजनामुळे राज्यात तसेच देशात तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देशभरात याविरोधात आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे देशाची सेवा करू इच्छिणारा तरूण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार हा राजकीय हेतूने असल्याचे भाजपने म्हटले आहे. यावरच आता काँग्रेस नेते तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“केंद्र सरकारने आपला अहंकार बाजूला ठेवून देशातील तरुणांचे भविष्य उद्धवस्त करणारी अग्निपथ योजना तात्काळ रद्द केली पाहिजे. देशात बेरोजगारी गेल्या 45 वर्षातील उच्चांकी पातळीवर असताना त्यांना रोजगार देण्याऐवजी कायमचे बेरोजगार करण्याचा चंगच केंद्र सरकारने बांधला आहे.”, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत केली आहे.

Agnipath Scheme Explained : काय आहे मोदी सरकारची ‘अग्निपथ योजना’?, का होतोय विरोध! जाणून घ्या…

अग्निपथ  योजना काय आहे?

अग्निपथ योजना हे भारतीय लष्कराच्या ‘टूर ऑफ ड्यूटी एंट्री स्कीम’ला दिलेले एक नवीन नाव आहे. सशस्त्र दलांनी दोन वर्षांपूर्वी टूर ऑफ ड्यूटी योजनेवर चर्चा सुरू केली. या योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या करारावर सैनिकांची भरती केली जाणार आहे. भरती झालेल्या तरुणांना प्रशिक्षित केले जाईल आणि त्यानंतर त्यांना विविध क्षेत्रात नियुक्त केले जाईल. यामुळे कायमस्वरूपी सैनिकांची भरती करण्याची सध्याची प्रथा संपुष्टात येईल आणि त्यामुळे सैन्य भरती योजनेत मोठा बदल दिसून येईल. सशस्त्र दलांना विशेष कामासाठी तज्ञ तरुणांची नियुक्ती करण्याचा पर्याय देखील असेल. याअंतर्गत लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये भरती होणार आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!