मुंबई: देशाची सेवा करू इच्छिणारा तरूण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार हा राजकीय हेतूने असून त्यातून गुन्हे दाखल झाल्यामुळे संबंधित तरुणांना कोणतीही नोकरी मिळणे अशक्य होईल व त्यांचे करिअरचे कायमस्वरुपी नुकसान होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. देशात सध्या अग्निपथ योजनेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात एस.टी.चे विलीनीकरण व्हावे,यासाठी
आंदोलन चिघळवणारे आता 'अग्निपथ'चे फायदे सांगताहेत.— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 19, 2022
“महाराष्ट्रात एस.टी.चे विलीनीकरण व्हावे यासाठी आंदोलन चिघळवणारे आता ‘अग्निपथ’चे फायदे सांगताहेत.”, असा टोला अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत भाजपला लगावला आहे. देशात अग्निपथ योजनेचा तरुणांकडू तीव्र विरोध केला जात असून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.
Agnipath Scheme Explained : काय आहे मोदी सरकारची ‘अग्निपथ योजना’?, का होतोय विरोध! जाणून घ्या…
अग्निपथ योजना काय आहे?
अग्निपथ योजना हे भारतीय लष्कराच्या ‘टूर ऑफ ड्यूटी एंट्री स्कीम’ला दिलेले एक नवीन नाव आहे. सशस्त्र दलांनी दोन वर्षांपूर्वी टूर ऑफ ड्यूटी योजनेवर चर्चा सुरू केली. या योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या करारावर सैनिकांची भरती केली जाणार आहे. भरती झालेल्या तरुणांना प्रशिक्षित केले जाईल आणि त्यानंतर त्यांना विविध क्षेत्रात नियुक्त केले जाईल. यामुळे कायमस्वरूपी सैनिकांची भरती करण्याची सध्याची प्रथा संपुष्टात येईल आणि त्यामुळे सैन्य भरती योजनेत मोठा बदल दिसून येईल. सशस्त्र दलांना विशेष कामासाठी तज्ञ तरुणांची नियुक्ती करण्याचा पर्याय देखील असेल. याअंतर्गत लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये भरती होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- केवळ लैंगिक सुखासाठी वेश्यालयात जाणे गुन्हा नाही; कोलकाता हायकोर्टाचा निकाल
- 56 वर्षाचा झंझावात! शिवसेनेच्या वर्धापनदिनी संजय राऊतांचे ट्वीट
- Agnipath Scheme: “शक्तिशाली भारत कधीही नको असलेल्या…”, पी. चिदंबरम यांचे मोठे वक्तव्य
- Agneepath Scheme: ‘अग्निपथ’ योजनेमागे भाजप आणि RSS चा गुप्त अजेंडा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
- मेहबूब शेख प्रकरणातील पीडित तरूणीच्या आरोपानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

