Share

केवळ लैंगिक सुखासाठी वेश्यालयात जाणे गुन्हा नाही; कोलकाता हायकोर्टाचा निकाल

Published On: 

नवी दिल्ली: कोलकाता हायकोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. केवळ लैंगिक सुखासाठी वेश्यालयात जाणारा ग्राहक हा गुन्हेगार ठरत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना चालवला जात असल्या प्रकरणी दिलेल्या निर्णयात न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

२०१९ साली ४ जानेवारीरोजी एनआरआय व्यावसायिक सुरेश बाबू एका मसाज सेंटरमध्ये गेले असता मसाजच्या नावाखाली कुंटणखाना चालवला जात असल्यामुळे पोलिसांनी छापा टाकत बाबू आणि ८ महिलांना अटक केली होती. या प्रकरणी पुढे  न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. बाबू यांचा दोषमुक्त अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या दरम्यान व्यावसायिक हेतूने व्यक्तीचे लैंगिक शोषण करणे, उपजीविकेचे साधन बनवणे हे अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे आहेत. ग्राहकाचा समावेश यात होत नाही. त्यामुळे वेश्यालयात जाणे हा गुन्हा ठरत नसल्याचे हायकोर्टाने म्हटले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!