🕒 1 min read
मुंबई: आज १९ जूनरोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. यानिमित्त शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील पवईत वेस्टीनमध्ये असल्याने शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेस्टीन हॉटेलमध्येच साजरा होणार आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्यक्षात सर्वांशी संवाद साधतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
56 वर्षाचा झंझावात!!! pic.twitter.com/wGfjMHfKHm
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 19, 2022
दरम्यान आज संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “56 वर्षाचा झंझावात!”, सोबतच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटोही संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे.
Agnipath Scheme Explained : काय आहे मोदी सरकारची ‘अग्निपथ योजना’?, का होतोय विरोध! जाणून घ्या…
आज राजकीय क्षेत्रातूनही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले की, “हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेची स्थापना केली. राज्याच्या सामाजिक व राजकीय जडणघडणीत शिवसेनेचा मोठा वाटा आहे. आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आणि सर्व शिवसैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा!”
महत्वाच्या बातम्या:
- Agneepath Scheme: ‘अग्निपथ’ योजनेमागे भाजप आणि RSS चा गुप्त अजेंडा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
- Agnipath Scheme: “शक्तिशाली भारत कधीही नको असलेल्या…”, पी. चिदंबरम यांचे मोठे वक्तव्य
- मेहबूब शेख प्रकरणातील पीडित तरूणीच्या आरोपानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- मेहबूब शेख प्रकरणाला नवे वळण; कथित पीडितेची चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार
- IND vs SA : आवेश खानने त्याच्या कामगिरीचे श्रेय ‘या’ कारणामुळे दिले राहुल द्रविडला; वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
