मुंबई: केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनामुळे देशातील वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध करत विविध ठिकाणी आंदोलन छेडले आहे. आता यावरच काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'Agnipath' is a policy statement of the central government that has triggered a huge controversy.
It is a political question that has to be resolved through peaceful protests as well as debate
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) June 19, 2022
“अग्निपथ’ हे केंद्र सरकारचे धोरणात्मक विधान असून त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. हा एक राजकीय प्रश्न आहे जो शांततापूर्ण आंदोलने तसेच चर्चेतून सोडवावा लागेल.”, असे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
Agnipath Scheme Explained : काय आहे मोदी सरकारची ‘अग्निपथ योजना’?, का होतोय विरोध! जाणून घ्या…
तसेच शक्तिशाली भारत कधीही नको असलेल्या अंतर्गत आणि बाह्य शक्ती तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला आहे. दरम्यान अग्निपथ योजना हे भारतीय लष्कराच्या ‘टूर ऑफ ड्यूटी एंट्री स्कीम’ला दिलेले एक नवीन नाव आहे. सशस्त्र दलांनी दोन वर्षांपूर्वी टूर ऑफ ड्यूटी योजनेवर चर्चा सुरू केली. या योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या करारावर सैनिकांची भरती केली जाणार आहे. भरती झालेल्या तरुणांना प्रशिक्षित केले जाईल आणि त्यानंतर त्यांना विविध क्षेत्रात नियुक्त केले जाईल. यामुळे कायमस्वरूपी सैनिकांची भरती करण्याची सध्याची प्रथा संपुष्टात येईल आणि त्यामुळे सैन्य भरती योजनेत मोठा बदल दिसून येईल. सशस्त्र दलांना विशेष कामासाठी तज्ञ तरुणांची नियुक्ती करण्याचा पर्याय देखील असेल. याअंतर्गत लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये भरती होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Agneepath Scheme: ‘अग्निपथ’ योजनेमागे भाजप आणि RSS चा गुप्त अजेंडा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
- मेहबूब शेख प्रकरणातील पीडित तरूणीच्या आरोपानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- मेहबूब शेख प्रकरणाला नवे वळण; कथित पीडितेची चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार
- IND vs SA : आवेश खानने त्याच्या कामगिरीचे श्रेय ‘या’ कारणामुळे दिले राहुल द्रविडला; वाचा!
- IND vs IRE : आयर्लंड दौर्यावर राहुल त्रिपाठीचं भारतीय संघात पदार्पण होणं कठीण, माजी खेळाडू म्हणाला…!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

