Share

Sharad Pawar | “एकच मुलगी मग अग्नी कोण देणार?”, प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे येथे ‘पुणे असोसिएशन’च्या वतीने ‘सिंगल डाॅक्टर फॅमिली’ या उपक्रमाचं शुभारंभ झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते. यावेळी लोकांनी शरद पवारांना अनेक प्रश्न विचारले. एवढंच नाही तर शरद पवारांनी त्यांच्या सार्वजनिक आयुष्यातील किस्से सांगितले

शरद पवार यांच्या उत्तरने जिंकलं सर्वांचं मनः

यादरम्यान, केवळ एकाच मुलीवर कुटुंब नियोजन केल्यावर कोणता सामना करावा लागला, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. यावरु उत्तर देत असताना पवरांनी जे वक्तव्य केलं त्याने अनेकांचं मन जिकलं.

मला एकच मुलगी आहे आणि मला अजिबात काळजी नाहीः

मला फारसा काही सामना करावा लागला नाही, मात्र, काही वेळा विविध प्रश्नांना तोंड द्यावं लागलं, एकदा निवडणुकीनिमित्त एका गावात गेलो होतो. यावेळी एका वयोवृद्ध व्यक्तीने विचारलं, तुम्हाला एकच मुलगी आहे, उद्या अचानक काही झालं तर अग्नी कोण देणार?, तेव्हा मी त्यांना सांगितलं, मला एकच मुलगी आहे आणि मला अजिबात काळजी नाही. लोकांना अग्नीची चिंता आहे, ही गोष्ट मला काही मान्य नाही. हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी, जिवंत असताना मुलीशी नीट वागण्याची चिंता करायची की मेल्यावर चितेला अग्नी कोण देणार याची चिंता करायची? असा सवालही पवारांनी लोकांना विचारत त्यांचं उत्तर स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!