Share

Uddhav Thackeray | “…मग दाखवतो शिवसेना काय आहे ते”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर हल्ला

Published On: 

मुंबई :   वेदांता प्रकल्प गुजारातला गेल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच गढूळ झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रातून गेला असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आहे. अशातच या सगळ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

सगळे एकत्र येऊन शिवसेना संपविण्याची भाषा उघडपणे केली जात आहे. सगळ्यांनी एकत्र व्हावे, हीच माझी अपेक्षा होती. विरोधकांना वेगवेगळे मारण्यामध्ये काही गंमत नसते. सर्वांनी एकत्र या, मग तुम्हाला दाखवतो शिवसेना काय आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना एक प्रकारचं आव्हानच दिलं आहे.

काल शिवसेना भवनमध्ये विभागप्रमुख व उपविभाग प्रमुखांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच, वेदांता फॉक्सकॉन वादावरही ते बोलले आहेत. सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातने पळवल्याचा आरोप त्याठिकाणी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिलेल्या या आव्हानाला काय प्रतिक्रिया येते हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रात आला असता तर, जवळजळ दीड लाख तरूणांना रोजगार उपलब्ध झाला असता. परंतू हा प्रकल्प राज्यातून गेल्यामुळे तरूणांचा रोजगार हिसकावून घेतला,असा आरोपही विरोधी पक्षनेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!