मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार जूनमध्ये कोसळले जेव्हा शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाविरुद्ध बंड केले होते. यानंतर शिंदे गटाने भाजप सोबत जात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 39 दिवसांनी पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लवकरच पार पडणार आहे.
शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकच होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दुसऱ्या विस्तारात कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिंदे गट तसेच भाजपमधील जे नेते नाराज झाले हेते त्यांना यावेळी मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे अद्यापही पालकमंत्रीपदाचे वाटप झाले नसल्याने विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “…मग दाखवतो शिवसेना काय आहे ते”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर हल्ला
- Shivsena। ठरलं! ‘या’ मैदानावर होणार आता शिंदे गटाचा दसरा मेळावा; दसरा मेळाव्यासाठीचा अर्ज पालिकेने स्विकारला?
- Vinayak Raut | एकनाथ शिंदेंवर टीका करताना विनायक राऊतांची घसरली जीभ म्हणाले…
- Aditya Thackeray | वेदांता प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्ला, म्हणाले…
- Atul Bhatkhalkar | “दसरा मेळावा कुठे होणार? आणि हसरा मेळावा कुठे होणार?”


