Shivsena। मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन्ही गट मूळ शिवसेनेचेच असल्याचा दावा करत आहेत. तर शिवसैनिक आजही आपल्या पाठिशी आहेत, असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यातून द्यायचा आहे, मात्र त्याच्या परवानगीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानासाठी अर्ज दखल केला होता. यानंतर आता आता सूत्रांकडून मोठी माहिती समोर आली आहे.
आता बीकेसीतील मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा अर्ज महापालिकेने स्विकारल्याची माहिती देखील समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या वतीने देखील दसरा मेळाव्यासाठी बीकेसीतील मैदानाची मागणी करण्यात आली होती. मात्र महापालिकेकडून शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेना व शिंदे गट यापैकी दसरा मेळाव्यासाठी नेमकं शिवाजी पार्क कुणाला मिळतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अशातच आता एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानावर घेतला जाणार की काय, अशी चर्चा रंगली आहे. शिवाजी पार्कनंतर आता शिंदे गटाकडून बीकेसीतील मैदानासाठीही अर्ज करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याबाबत पालिकेच्या प्रशासकांकडून नेमकी परवानगी कुणाला दिली जाते, याची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Vinayak Raut | एकनाथ शिंदेंवर टीका करताना विनायक राऊतांची घसरली जीभ म्हणाले…
- Aditya Thackeray | वेदांता प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्ला, म्हणाले…
- Atul Bhatkhalkar | “दसरा मेळावा कुठे होणार? आणि हसरा मेळावा कुठे होणार?”
- Bhagat Singh Koshyari | क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट यशस्वी करावे ; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
- ‘स्वच्छ समुद्र सुरक्षित समुद्र’ अभियानाचा समारोप राज्यपाल, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत संपन्न


