Share

Aditya Thackeray | वेदांता प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्ला, म्हणाले…

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण सध्या खूप जास्त गढूळ झालं आहे. त्यात महाराष्ट्रात येणारा वेदांत प्रकल्पही गुजरातला गेल्यामुळे, विरोधी पक्षनेते सत्तधाऱ्यांवर आणि सत्ताधारी विरोधी पक्षनेत्यांवर आरोप, टीका करताना दिसून येतं आहे. अशातच शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का, ज्यामुळे प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली?, असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे. काल थोर समाज सुधारक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आदित्य ठाकरे यांनी अभिवादन केलं. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

26 जुलैला मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं की वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येणार असून, 4 लाख कोटी घेऊन येणार आहेत. एमआयडीसीच्या मॅगझीनमध्ये सांगितलं की एक लाख कोटी घेऊन येणार आहेत. त्यानंतर अजून एक गोष्ट समोर आली की, 29 ऑगस्टला उपमुख्यमंत्री आणि अनिल अग्रवाल यांची भेट झाली. ही भेट लहान भावाला प्रकल्प देण्यासाठी झाली का?, असा सवालही ठाकरे यांनी याठिकाणी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य –

दरम्यान, गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही, लहान भाऊच आहे. आपल्यात निकोप स्पर्धा असून महाराष्ट्र गुजरातलाच नव्हे, तर कर्नाटकलाही मागे टाकणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी सांगितले. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, पुढील दोन वर्षांत महाराष्ट्र राज्य गुजरातच्या पुढे जाऊन देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!