मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेत् आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगत असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केल्यापासून शिंदे घट आणि ठाकरे गट झाला आहे. अशातच शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले विनायक राऊत ?
विनायक राऊत एकनाथ शिंदे यांच्यावर नेहमीच टीका करत असतात, परंतू यावेळी शिंदेंवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली असल्याचं समजतं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. दहिसर शिवसेना नागरी सत्कार समारंभ काल पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं, शिवसेना नाव पुसून टाकायचं, या भडवेगिरी करणाऱ्या 40 शिवसेना आमदारांच्या माध्यमातून हीच खरी शिवसेना आहे, बिंबवण्याचा त्यांचा उद्देश असल्याचं विनायक राऊत यांनी सांगितल आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, परंतू असं सांगणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावंच लागणार आहे.
दरम्यान, विनायक राऊतांनी केलेल्या शिवीगाळमुळे राज्यातील राजयकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- NCP | “…असं शक्य झालं नाही, तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?”, राष्ट्रवादीचा खोचक सवाल
- Hero Splendor | हिरो स्प्लेंडर प्लस नवीन रंगात..! काय विशेष आहे ते जाणून घ्या!
- Health Hack | शाकाहारी लोकांनी प्रोटीन कसे आणि कुठून मिळवावे, जाणून घ्या!
- Raj Thackeray | प्रबोधानकार ठाकरेंच्या जयंती निमीत्त राज ठाकरेंनी करुन दिली ‘त्या’ भाषणाची आठवण
- Supriya Sule | “… एवढ्या मोठ्या नाहीत ताई”, सुप्रिया सुळेंच्या ट्विटवर संदीप देशपांडेंचा टोला


