Share

‘शरद पवार यांच्यामुळे साखर उद्योगातील लाखो कुटुंबीयांना आजपर्यंत स्थैर्य मिळाले’

Published On: 

कोल्हापूर- राज्यात कोरोनाने एकाबाजूला थैमान घातले आहे तर दुसऱ्या बाजूला साखर उद्योग तसेच शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ऊसकरी, शेतकरी व साखर उद्योगाबाबत कारखानदारांना घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

या भेटीत साखर व्यवसायाचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्नानावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. फडणवीस-शाह भेटीत बफरस्टॉकची मुदत जुलै 2020 असून ती वाढवणे, साखरेचे एक्सपोर्ट धोरण ठरवणे, कारण साखर उत्पादन जादा होणार आहे. एक्सपोर्ट अनुदान व बफर स्टाॅकचे व्याज कारखान्यांना तत्काळ द्यावे. कारखान्यांना तोटा भरून काढण्यासाठी प्रतिटन 600 रुपये अनुदान देणे,इथॅनॉलचे दीर्घकालीन धोरण ठरवून आर्थिक मदत करणे. कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे रिझर्व बँकेस आदेश काढणे याबाबत ही चर्चा होऊन निर्णय घेण्याचे ठरले असे समजते.

दरम्यान, फडणविसांच्या या भेटीवर राष्ट्रवादीने टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना साखर उद्योगाची जाणीव झाली त्यामुळे समाधान वाटले, असा उपरोधिक टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. शरद पवार यांच्यामुळे साखर उद्योगातील लाखो कुटुंबीयांना आजपर्यंत स्थैर्य मिळाले आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले.

etv भारतने दिलेल्या वृत्तानुसार, साखर व्यवसायावर लाखो ऊस उत्पादक, लाखो कामगार, शेतकऱ्यांसह देशाचे आणि राज्याचे अर्थकारण अवलंबून आहेत. शरद पवार गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांसाठी किती कठोर मेहनत या वयामध्ये घेत आहेत, याची जाणीव फडणवीस साहेबांना निश्चित झाली असेल असा टोलासुद्धा मुश्रीफ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून फडणवीस यांना लगावला.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भूमिपूजनाचा घाट – थोरात

दूध दरासंदर्भात मंत्रालयात उद्या बैठक;बळीराजाला मायबाप सरकारकडून मोठी आशा

शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही, उमा भारतींचा जोरदार टोला

सोमवारपासून लागू होणार ‘हा’ नवा कायदा,ग्राहकांना होणार थेट फायदा

‘राममंदिराच्या भूमी पूजनामुळे पवारांना मिरच्या लागणे स्वाभाविकच आहे’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!