Share

शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही, उमा भारतींचा जोरदार टोला

Published On: 

नवी दिल्ली : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भव्य मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने शनिवारी एक बैठक घेतली. या बैठकीत मंदिराच्या भूमीपूजनासाठी ३ आणि ५ ऑगस्ट या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या.

निश्चित केलेल्या तारखांपैकी ज्या तारखेला पंतप्रधान उपस्थित राहू शकतील त्या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भूमीपूजन सोहळा करण्याची योजना ट्रस्टने निश्चित केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्रस्टचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ५ ऑगस्टला मंजुरी दिली. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम ३ ते ४ तास चालेल. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी काशीवरून पुजारी बोलवण्यात येणार आहेत. ५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

या भूमीपूजनावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलंय.

कोरोनाच्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भूमिपूजनाचा घाट – थोरात

शरद पवारांच्या या विधानावरून संपूर्ण देशात राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नसून भगवान रामाच्या विरोधात आहे, अशी टीका भाजप नेत्या उमा भारती यांनी केली आहे.

‘शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही आहे. ते पंतप्रधान मोदींच्या विरोधात नसून भगवान राम यांच्याविरोधात आहे’. असं उमा भारती म्हणाल्या. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी गणपतीची पूजा करण्यासाठी त्या भोपाळमधील प्राचीन गणेश मंदिरात गेल्या होत्या.

‘भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकारच नाही, बाळासाहेब थोरातांचा टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!