Share

कोरोनाच्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भूमिपूजनाचा घाट – थोरात

Published On: 

अहमदनगर : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भव्य मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने शनिवारी एक बैठक घेतली. या बैठकीत मंदिराच्या भूमीपूजनासाठी ३ आणि ५ ऑगस्ट या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या.

निश्चित केलेल्या तारखांपैकी ज्या तारखेला पंतप्रधान उपस्थित राहू शकतील त्या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भूमीपूजन सोहळा करण्याची योजना ट्रस्टने निश्चित केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्रस्टचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ५ ऑगस्टला मंजुरी दिली. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम ३ ते ४ तास चालेल. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी काशीवरून पुजारी बोलवण्यात येणार आहेत. ५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

यावर आता कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

‘भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकारच नाही, बाळासाहेब थोरातांचा टोला

श्रीराम दैवत आहे. पण रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे. आपण जगलो तर रामाचं दर्शन घ्यायला जाऊ. त्यामुळे केंद्र सरकारने आता माणसं जगवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मात्र, केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरून दुर्लक्ष करण्याकरता हा राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. तसेच या भूमिपूजन सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याविषयी बाळासाहेब थोरात यांना विचारले असता, तो त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे, अस त्यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, या भूमीपूजनावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलंय.

मोठी बातमी : दूध दरासंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!