Share

सोमवारपासून लागू होणार ‘हा’ नवा कायदा,ग्राहकांना होणार थेट फायदा

Published On: 

नवी दिल्ली- संसदेने गेल्या वर्षी संमत केलेला आणि कोरोना टाळेबंदीत अडकून पडलेला नवा ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अखेरीस सोमवार 20 जुलैपासून लागू होत आहे. याबाबतची सूचना केंद्र सरकारने कालच जारी केली आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने हा कायदा त्वरीत अंमलात यावा यासाठी पाठपुरावा केला होता.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी अशी माहिती दिली की, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण लवकरच काम सुरू करेल. हा कायदा अनुचित व्यापार प्रक्रिया रोखण्यासाठी सामूहिक कृती आणि नियमांची अंमलबजावणी करून ग्राहकांच्या हिताचे रक्षण करेल. त्याचप्रमाणे ते सोमवारी 20 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात संबोधित करणार असल्याचेही म्हणाले.

ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार तुम्हाला मिळतील हे अधिकार पीआयएल किंवा जनहित याचिका आता ग्राहक मंचामध्ये दाखल करता येईल. आधीच्या कायद्यात तसे नव्हते. नव्या कायद्यात पहिल्यांदाच ऑनलाईन आणि टेलिशॉपिंग कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. खाद्यपदार्थ तसंच पेयांच्या भेसळ प्रकरणी कंपन्यांना दंड आणि तुरूंगवासाची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

क्रीडा विश्वात हळहळ : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू

भारतात कोरोनाचा हाहाकार ; २४ तासांत ३४,८८४ नवे कोरोना रुग्ण

‘सचिन पायलट परत आले, तर मी त्यांना कडकडून मिठी मारेन’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!