Share

दूध दरासंदर्भात मंत्रालयात उद्या बैठक;बळीराजाला मायबाप सरकारकडून मोठी आशा

Published On: 

मुंबई – राज्यात दुध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. राज्य सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यातच आता आज भाजप आणि विरोधी पक्ष संघटना या मुद्द्यावरून चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यात किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने राज्यभरात ठिकठिकाणी दूधआंदोलनाला सुरुवात केली आहे. अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दुधाला 30 रुपये भाव द्या, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. नगरमध्ये दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

दुधाला प्रति लीटर 30 रुपये दर द्या, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्यात येणार आहे. ‘भिक नको घामाचे दाम द्या’ अस म्हणत शेतकरी आंदोलन करत आहेत.

दरम्यान, दूध दरासंदर्भात मंत्रालयात उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्री, शेतकरी संघटनेचे काही प्रतिनिधी तसंच प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील. मंत्रालयात सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही, उमा भारतींचा जोरदार टोला

सोमवारपासून लागू होणार ‘हा’ नवा कायदा,ग्राहकांना होणार थेट फायदा

‘राममंदिराच्या भूमी पूजनामुळे पवारांना मिरच्या लागणे स्वाभाविकच आहे’

सोलापूरकर कोरोनावर निश्चित मात करतील;खासदार शरद पवार यांना विश्वास

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!