पुणे : शरद पवार यांनी दगडूशेठ मंदिरात न जाता बाहेरूनच हात जोडले. नॉनव्हेज खाल्लं होतं म्हणून मंदिरात शरद पवार गेले नाहीत.
दगडूशेठच्या शेजारी असणारी गृह विभागाची जागा दगडूशेठ ट्रस्टला देण्याचे अनेक दिवसांची मागणी होती , त्यासाठी शरद पवार भिडे वाडा आणि दगडूशेटच्या पाहणीसाठी आले होते. बोल घेवड्या नेत्यांपेक्षा एक वेगळा आदर्श त्यांनी घालून दिला असे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं.