मुंबई : छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं.
तसेच या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप देखील केला. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं संभाजीराजे म्हणाले. यावर आता मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रतीक्रिया दिली आहे.