Share

IPL 2022 RR vs RCB Qualifier 2 : खचाखच भरलेल्या मोदी स्टेडियमवर राजस्थाननं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये आज क्वालिफायर २ (Qualifier 2)चा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs RCB) यांच्यात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  राजस्थान रॉयल्सला पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सकडून रोमहर्षक सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध विजय नोंदवून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला.

राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करण्याची ही सुवर्णसंधी असेल. या सामन्यात फिनिशर म्हणून शिमरॉन हेटमायरकडून झंझावाती खेळीची अपेक्षा केली जाईल. गेल्या सामन्यात युझवेंद्र चहल आणि रवीचंद्रन अश्विन ही फिरकी जोडी प्रभावी ठरली नाही. त्यामुळे मोठी धावसंख्या करूनही संघाचा पराभव झाला. नव्या चेंडूमुळे फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहलीला रोखण्याची जबाबदारी ट्रेंट बोल्टवर असेल. दुसरीकडे, प्रसिद्ध कृष्णाला मागील सामना विसरावा लागेल, ज्याच्याविरुद्ध डेव्हिड मिलरने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.

गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चांगली कामगिरी केली असून संघ आत्मविश्वासाने भरलेला असेल. मात्र, विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसच्या बॅटमधू धावा निघाल्या नाही. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रजत पाटीदारने आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आणि एलिमिनेटर सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले आहे. ग्लेन मॅक्सवेलकडून संघाला स्फोटक खेळीची अपेक्षा असेल.

दोन्ही संघांची Playing 11

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, ओबेद मॅकॉय, युझवेंद्र चहल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!