मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यासह देशात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले. यानंतर देशात लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादाने खळबळ माजवली.
राजकीय वर्तुळात हनुमान चालिसा आणि लाऊडस्पीकरवरून उग्र राजकारण होत आहे. या भोंगा प्रकरणावर पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.