Share

Shahajibapu Patil | “अजित पवारांना आता काम उरलेलं नाही, त्यांनी फक्त शिंदे, ठाकरे, इंदोरीकरांची भाषणं ऐकावीत”, शहाजीबापू पाटलांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सत्तांतर होण्यापुर्वी झालेल्या बंडाने राज्यातील राजकरणात खळबळ माजवली होती. यावेळी जिवढी चर्चा बंडाची अथवा कोणत्याच गोष्टीची झाली नाही, तितकी चर्चा शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या एका डायलाॅगची झाली होती. अशातच आपल्या डायलाॅगबाजीसाठी प्रसिद्ध असलेले एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते शहाजीबापू पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

शहाजीबापू पाटील यांचा अजित पवार यांना टोला :

अजित पवारांना आता का काहीच काम उरलं नाही, ते विरोधी पक्षनेते झालेत मात्र, ते कायम सत्तेत राहत असल्यानं नेमकं काय करायचे हेच त्यांना कळत नाहीये, असं शहाजी पाटील म्हणाले. एवढंच नाही तर अजितदादांनी आता फक्त शिंदे, ठाकरे, इंदोरीकर महाराजांची भाषणे ऐकावीत असा टोला देखील पाटलांनी अजित पवारांना लगावला आहे.

अजित पवारांनी कितीही राज्याचे दौरे केले तरी पुढचे 15 वर्षे शिंदे-फडणवीस यांचेच सरकार राहणार :

दरम्यान, अजित पवारांनी कितीही राज्याचे दौरे केले तरी पुढचे 15 वर्षे शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis Govt) यांचेच सरकार राहणार असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसपासून राष्ट्रवादीपर्यंत राजकारणात आहेत, तरी कधी 50 आमदारांच्या पुढे आकडा का गेला नाही? असा सवाल बाटलांनी केला आहे.

दरम्यान, आर आर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्यामुळं एकदा 55 ते 60 पर्यंत आमदारांची संख्या पोहोचली होती, असं म्हणत शहाजीबापू पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना डिवचल आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!