मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून तपास यंत्रणांसह किरीट सोमय्या आणि भाजपवर जोरदार टीका केली गेली. म्हणाले, “केवळ सूडबुद्धीने महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे जनतेचे पैसै हडप करणारे भाजप नेते कोणावर कारवाई होणार याची भाकिते करण्यात मश्गूल आहेत”. असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अकाऊंटवरून करण्यात आले.
तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१३ साली ‘सेव्ह विक्रांत’ मोहिमेंतर्गत तब्बल ५८ कोटी रुपये राज्यपालांचे नाव पुढे करून चक्क भारतीय जनता पक्षाच्या खात्यात जमा केले. कोर्टात युक्तिवाद सुरू असताना किरीट सोमय्या यांच्या वकिलाने सांगितले की, राजभवनाचे बँकेत खाते नव्हते म्हणून किरीट सोमय्यांनी सेव्ह विक्रांतचा निधी हा भाजपच्या खात्यात वळता केला.
आता इतका मोठा गैरव्यवहार उघड झाला असताना केंद्रीय तपास यंत्रणा किरीट सोमय्या आणि भाजपच्या मागे लागणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. असेही त्यांनी ट्विट द्वारे म्हंटले.
महत्वाच्या बातम्या –
सोमय्या बेपत्ता : “आम्ही केंद्राला विचारू की तुमची सुरक्षा…”, गृहमंत्र्यांचे टीकास्त्र
“…म्हणून मी काश्मीर फाईल्स पाहिला नाही”; सोनू निगमचा खुलासा
“११ हजार की ५८ कोटी याचा तपास…”, सोमय्यांच्या खुलास्यानंतर राऊतांचा इशारा
“धमक्या देऊन थायलंड बँकॉकमध्ये पैसे…”, किरीट सोमय्यांच्या व्हिडिओनंतर संजय राऊतांचा नवा आरोप
“गुप्तचर विभागाने कळवूनही पोलिसांनी…”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी गृहमंत्र्यांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

