Share

सोमय्या बेपत्ता : “आम्ही केंद्राला विचारू की तुमची सुरक्षा…”, गृहमंत्र्यांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नोटिसीद्वारे आदेश देण्यात आले होते. परंतु किरीट सोमय्या हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला गेले असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली. यावरून संजय राऊत यांनी किरीट सोमय्या मुलासह फरार झाले आहेत, असा आरोप केला. दरम्यान, या मुद्द्यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी भाष्य केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना वळसे पाटील म्हणाले की,‘आम्ही केंद्राला विचारू की तुमची सुरक्षा असलेले लोक कुठे आहेत. आरोप करणं सोपं असतं, परंतु स्वत:वर आरोप झाले की त्याला सामोरं जायचं नाही, हे काही फार शूरपणाचं लक्षण नाही’, असे ते म्हणाले.

दरम्यान, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी देखील भाष्य केले असून यासंदर्भात ट्विट करत ते म्हणाले आहेत की,‘किरीट सोमय्या बेपत्ता असल्याची शहरात चर्चा आहे. पण ‘Z plus’ सीआयएसएफ सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊ शकत नाही कारण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती निश्चितपणे असेल.जर किरीट सोमय्या लपत असतील तर तपास यंत्रणांना आवश्यकता असेल तेव्हा माहिती देणे हे केंद्रीय गृहमंत्रालयाचे कर्तव्य आहे.’

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!