मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेवर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतांनाच आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी याविषयी मोठे वक्तव्य केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना वळसे पाटील म्हणाले की,‘गुप्तचर विभागाने ४ एप्रिल रोजी पत्र लिहून कळवूनही पोलिसांनी हवा तेवढा बंदोबस्त ठेवला नाही. या संदर्भात चौकशी सुरु करण्यात आली असून संबंधित पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.’ तसेच या संदर्भात नक्की कशी चौकशी सुरु आहे? हे आता न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना, उघड करणे काही योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, यापूर्वी कोर्टाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तद्पश्चात काल पुन्हा सदावर्ते यांची १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- अटकपूर्व जामिनासाठी प्रविण दरेकर हायकोर्टात, आज होणार सुनावणी
- संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेले सोमय्या ‘ON TWITTER’; संजय राऊतांच्या आरोपांचे खंडन करत दिले आव्हान
- “‘झेड प्लस’ सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊ शकत नाही कारण…” राष्ट्रवादीचे टीकास्त्र
- निवडणूका जवळ आल्यावर तुम्हाला मुंबईचे पाणी कसं आठवलं? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल
- “… पूरस्काराने मोदींचा बहुमान वाढला आणि पुरस्काराचाही”, प्रवीण दरेकरांचे विधान


