🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बंडखोर आमदार आसामची राजधानी गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे. महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत आहेत. यानंतर आज संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले कि, शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, गुवाहाटीला गेलेले आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील, असं ते म्हणालेत. तसेच पुढे शिवसेना पार्टी ही आमच्या रक्तानं बनलेली आहे. फक्त कोणाकडं, तरी पैसा आहे म्हणून कोणी विकत घेऊ शकत नाही. आमच्यावर कोणतंही संकट नाही. आमच्यासाठी पक्षाच्या विस्ताराची ही संधी आहे. पक्षाचे विचार आणि भविष्यातील संधींवर आम्ही विचारमंथन करणार आहोत, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे बंडखोरांना आव्हान दिल आहे.
दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी हिमंत असेल तर शिवसेना आणि ठाकरे यांचे नाव न घेता उभे राहून दाखवा. माझा फोटो न दाखवता लोकांमध्ये जा. मेलो तरी पण शिवसेना सोडणार नाही असे म्हणणाऱ्यांनी आज शिवसेना सोडली. शिवसेना फोडण्याचे पाप बंडखोरांनी केले आहे. ज्यांना मला मुख्यमंत्री म्हणून बघायचे नाही, त्यांच्या महत्त्वाकांक्षा राक्षसी आहेत. जे आम्हाला सोडून गेले त्यांची मी काय काळजी करू?,असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी काल उपस्थित केला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
