🕒 1 min read
मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत आसामला तळ ठोकला आहे. आपल्याच पक्षातील आमदारांनी साथ सोडल्यामुळे शिवसेना संपली असे विरोधकांकडून म्हटले जात आहे. मात्र याचा परिणाम महाविकास आघाडी सरकारवरही दिसून येत आहे. शिंदे यांच्या गटात सेना आमदारांची संख्या वाढत आहे तर इकडे सेनेला गळती लागली आहे. काल (२४ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधत बंड आमदारांना आव्हान दिले आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीका केली आहे.
बाप लेकाची ऑनलाइन सभा,
लंगोट गेली पण माज नाही गेला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 24, 2022
“बाप लेकाची ऑनलाइन सभा, लंगोट गेली पण माज नाही गेला.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. दरम्यान “माझं नाव, फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा. तुमच्याकडून शिवसेना फोडण्याचं पाप झालं आहे. मात्र तिकडे तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. मी बाळासाहेबांचे फोटो वापरून ब्लॅकमेल करत नाही.”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी बंड करणाऱ्या आमदारांना सुनावले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, ““मला सत्तेचा लोभ नाही. मी वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय पण जिद्द कायम आहे. आणि आत्ताही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. स्वप्नातही विचार केला नव्हता की, सोबतचे असे वागतील. मी बरा होऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. मला वाटलं सीएम पदाची खुर्ची हलतेय पण ते मानेचं दुखणं होतं. शरीराचे काही भाग बंद पडत होते, त्यामुळे दोन वेळा ऑपरेशन करण्याची वेळ आली होती. मात्र मी अजून जिद्द सोडली नाही, जिद्द अजूनही कायम आहे.”,
महत्वाच्या बातम्या:
- Sujat Ambedkar : “गुवाहाटीध्ये काही कट्टर मराठी लोक अडकलेत, त्यांना परत आणण्यासाठी…”; सुजात आंबेडकरांच ट्विट चर्चेत
- Deepali Sayed : “शालिनी बाई उगाच कळ काढु नका, तुमचे मामु बरे होण्याआगोदरच पक्ष सपाट होईल तुमचा”
- Kavita Navande Suspended : अखेर औरंगाबादच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे निलंबित!
- Ajit Pawar : एकनाथ शिदेंच्या बंडासंदर्भात बोलताना अजित पवारांना आठवला पहाटेचा शपथविधी, म्हणाले…
- Shivsena : शिवसेनेची मोठी खेळी अडचणीत, नरहरी झिरवळांविरोधात दोन अपक्षांनी थोपटले दंड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
