🕒 1 min read
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला उतरती कळा लागल्याचे म्हटले जात आहे. याचा फटका ठाकरे सरकारला बसत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तसेच शिवसेनेच्या अनेक बैठका सुरु असून आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले आहे.
“शिवसेना कुणीही हायजॅक करू शकत नाही. शिवसेना पक्ष आमच्या रक्ताने बनलेला पक्ष आहे. शेकडो लोकांनी यासाठी बलिदान दिले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. या संकटाला आम्ही एक संधी समजतो. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आज लाखो शिवसैनिक आहेत. पक्ष मजबूत आहे. आजच्या कार्यकारिणी बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होतील .आजची बैठक राजकारण आणि देशाला दिशा देणारी ठरेल.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आरोप केला आहे की, आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. याची जबादारी सरकारची असते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, “ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यांनी ढुंगणाला पाय लावून राज्यातून पलायन केले आहे. त्यांना आमदार म्हणून सुरक्षा आहे. आमदारांना सुरक्षा असते कुटुंबियांना नाही. महाराष्ट्रात या, आपल्या राज्यात या. असे वणवण का फिरताय?भिकाऱ्यासारखे फिरू नका. तुम्ही वाघ आहात बकरीसारखे का म्या म्या करत आहात.”
महत्वाच्या बातम्या:
- Kavita Navande Suspended : अखेर औरंगाबादच्या भ्रष्ट जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे निलंबित!
- Sanjay Raut : “भारतीय जनता पक्ष एक महाशक्ती…”, संजय राऊतांचा खोचक टोला
- Keshav Upadhye : “भावी शिवसेनाप्रमुख जाहीर…”, ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- Nilesh Rane : “लंगोट गेली पण माज…”, उद्धव ठाकरेंच्या सभेवर निलेश राणेंची टीका
- Sujat Ambedkar : “गुवाहाटीध्ये काही कट्टर मराठी लोक अडकलेत, त्यांना परत आणण्यासाठी…”; सुजात आंबेडकरांच ट्विट चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
