मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत आसामला तळ ठोकला आहे. शिंदे यांच्या गटात सेना आमदारांची संख्या वाढत आहे तर इकडे सेनेला गळती लागली आहे. काल (२४ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधत बंड आमदारांना आव्हान दिले आहे. यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी टीका केली आहे.
“आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का?”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. याद्वारे किती खुबीने भावी शिवसेनाप्रमुख जाहीर करून टाकला. असा टोला केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत लगावला आहे.
“आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का ?”- उद्धव ठाकरे
– किती खुबीने भावी शिवसेनाप्रमुख जाहीर करून टाकला!!
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 25, 2022
नेमके काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हीच गोष्ट उद्या आदित्यसोबतही (Aaditya Thackeray) घडणार नाही का? आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे कसं चालतं, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावला होता.
तसेच “बाप लेकाची ऑनलाइन सभा, लंगोट गेली पण माज नाही गेला.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. दरम्यान “माझं नाव, फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा. तुमच्याकडून शिवसेना फोडण्याचं पाप झालं आहे. मात्र तिकडे तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. मी बाळासाहेबांचे फोटो वापरून ब्लॅकमेल करत नाही.”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी बंड करणाऱ्या आमदारांना सुनावले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Nilesh Rane : “लंगोट गेली पण माज…”, उद्धव ठाकरेंच्या सभेवर निलेश राणेंची टीका
- Sujat Ambedkar : “गुवाहाटीध्ये काही कट्टर मराठी लोक अडकलेत, त्यांना परत आणण्यासाठी…”; सुजात आंबेडकरांच ट्विट चर्चेत
- Deepali Sayed : “शालिनी बाई उगाच कळ काढु नका, तुमचे मामु बरे होण्याआगोदरच पक्ष सपाट होईल तुमचा”
- Kavita Navande Suspended : अखेर औरंगाबादच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे निलंबित!
- Ajit Pawar : एकनाथ शिदेंच्या बंडासंदर्भात बोलताना अजित पवारांना आठवला पहाटेचा शपथविधी, म्हणाले…


