Share

TET Scam | “…तर त्यांना फासावर लटकवा”; टीईटी प्रकरणावर अब्दुल सत्तार संतप्त

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टीईटी घोटाळा म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामध्ये दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हि यादी परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आली असून यामध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावाचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणात आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आले आहेत. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत. या दोन्ही मुली टीईटी घोटाळ्यामध्ये दोषी आढळल्या आहेत. तसेच या यादीत नावं असलेल्या सगळ्यांवर टीईटीची परीक्षा देण्यासाठी कायमची बंदी घालण्यात आली आहे. परंतु यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देत हे त्यांच्या मुली दोषी नसल्याचं म्हंटल आहे.

“माझ्या मुलींनी परीक्षा दिली होती मात्र त्या पात्रच झाल्या नाहीत मग त्यांची नावं या यादीच आलीच कशी? माझ्या मुली या माझ्याच संस्थेत २०१७ साली नोकरीला लागल्या आहेत. त्यानंतर त्यांनी हि परीक्षा दिली होती मात्र त्यात त्या दोघीही अपात्र ठरल्या. त्याची प्रमाणपत्र देखील माझ्याकडे आहेत. त्याची कॉपी कुणाला हवी असल्यास मी देऊ शकतो. माहितीच्या अधिकाराखाली शिक्षण खात्यातील कोणतीही माहिती कुणीही मिळवू शकतो. त्यामुळे जर माझ्या मुली त्यात दोषी आढळल्या तर कारवाई करावी, पण जर त्यांची यात काही चूक नसेल तर मात्र ज्यांनी हा बदनामीचा कट रचला आहे त्यांना फासावर लटकवलं पाहिजे”, अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी संताप व्यक्त केला.

बदनामीचा कट

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले कि, “या प्रकरणाची नीट चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तसेच असं कोणलाही बदनाम करण्याचं काम करू नये. आमच्या संस्थेतून शिक्षण विभागात एकही कागद गेला असेल, तर आम्हाला बदनामीचा कट जबाबदार धरावं. पण जे लोक चुकीची माहिती देऊन राजकारणात आणि समाजात आम्हाला बदनाम करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही सत्तारांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!