Share

MNS on Eknath Shinde | “तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे…” ; मनसेची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरे सुरुच आहेत. एकनाथ शिंदे रविवारी झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन 35 दिवसांहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. त्यामुळे विरोधक शिंदे सरकारवर टीका करत आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

“बंड झाले,आता थंड झाले?. पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्ह्याला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल ?”, असा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला.

संदीप देशपांडे यांचे देखील सरकारवर टीकास्त्र –

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा. लोकांची सहनशक्ती संपत चालली आहे, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. उदय सामंत यांनी सांगितलं की सीईटी आणि इयत्ता बारावीचे मार्क वैद्यकीय प्रवेशासाठी गृहित धरले जातील. सामंत यांनी हे सांगितलं. पण हा प्रश्न अजून प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने त्यावरही निर्णय घ्यावा. राज्यात मंत्रीच नसल्याने जनता लटकली आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तार करायला का घाबरताय? – अजित पवार

दरम्यान, शनिवारी अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तब्बल 36 दिवस उलटले, तरी अजून मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाहीये. एकनाथ शिंदे सोबत आलेल्या चाळीस आमदारांना जर मंत्रीपदाची गाजर दाखवले असतील तर आता ऐनवेळी अडचण होणारच ना. मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने लोकांचे कामं रखडली आहेत. तसेच अधिवेशनही रखडलं आहे, जर तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे तर मंत्रिमंडळ विस्तार करायला का घाबरताय?, अशी घनाघाती सवाल करत अजित पवारांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!