मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता अनेक मोठे गौप्यस्फ़ोट समोर येत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडाची पाठीमागील कारणे हळूहळू समोर येत आहेत. आज शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी अनेक मोठे खुलासे माध्यमांशी बोलताना केले आहेत. अब्दुल सत्तार संपूर्ण हकिकतच ऐकवली आहे. बंडामागची कारणमिमांसा ऐकवतानाच अनेक किस्सेही त्यांनी सांगितले. तसेच अनेक खुलासेही समोर आले आहेत.
विधानपरिषदेचे मतदान झाल्यावर शिंदे नाराज दिसले. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली. अनिल देसाई आणि शिवसेनेचे तीन नेते आत बसले होते. शिंदे बाहेर आमदारांसोबत बसले. ते नाराज होते. निर्णय लागण्याआधीच आमचा निर्णय लागला. अजित दादासोबत बसलो होतो. दीड तास बसलो. जयंत पाटील होते. यानंतर मी तिथून निघालो. यानंतर पुढे आम्ही जात असताना मुख्यमंत्र्यांचा फोन आला.
मी म्हटलं मी वसई, विरारला कार्यक्रमाला चाललो. माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ता आहे. त्याचा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्र्यांचा पहिला फोन मलाच आला. ते म्हणाले, बघा काही तरी गडबड आहे. मी म्हटलं काही गडबड नाही. आमची गाडी सुरू आहे. नंतर आम्ही हॉटेलवर गेलो. यानंतर पुढे आम्ही गुजरात हायवेच्या दिशेने निघालो. आम्ही गुजरातला गेल्यावर गुजरातच्या पाट्या पाहिल्या. बॉर्डवर येईपर्यंत वाटलंही नाही गुजरातला आलो. जाममधून आम मिळाला खायला, हा किस्सा सत्तार यांनी बोलताना सांगितला.
दरम्यान, पुढे यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले, शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची भावना होती. रात्री दोन वाजताही शिंदे फोन उचलतात. ते धावून येतात. काही नेत्यांना भेटीची मागणी केली तरी ते भेटायचे नाही. मला कोरोना झाल्यावर लिलावतीत दाखल केले होते. तेव्हा ते किट्स घालून मला भेटायला आले. मलाच नाही तर अनेकांना ते भेटायला गेले. एकनाथ शिंदेंसारखा नेता आणि मुख्यमंत्री आतापर्यंत पाहिला नाही, असंही सत्तार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :


