मुंबई : काल (२४ मार्च) विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सफाई कामगार, झोपडपट्टीवासीयांसह ३०० आमदारांना घरं देणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधकांकडून ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. असे असतांनाच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविषयी नापसंती व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘आमदारांच्या घरांच्यासंदर्भात माझी मते वेगळी आहेत. माझाही भाऊ आमदार आहे. परंतु मला घर नको आहे. मी याबाबत बोलणार नाही. माझे मत वेगळे आहे,’ असे राऊत म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी काही दिवस पूर्वी मांडला होता. मला या गोष्टीचे समाधान आहे कि देशाचा आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबई रूप पुढे कसं असणार आहे, ते ठरवण्याच्या दृष्टीने कष्टकऱ्यांना आणि झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे मिळावीत म्हणून ज्या योजना आणल्या आहेत त्यासाठी मी मंत्र्यांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो’, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- “हा खर्च कुणाच्या सांगण्यावरून?”, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ घोषणेवर संदीप देशपांडेंचा सवाल
- फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ आरोपावर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले ,”यांना दाऊदने सुपारी दिली…”
- VIDEO : “चांगलं वाटतंय, पण…”; CSKचा कॅप्टन झाल्यानंतर जडेजा पहिल्यांदा काय म्हणाला पाहा!
- …त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज द्या- राजू पाटील
- “यापुढे आघाडीत सहभागी व्हायचं की नाही, हा निर्णय…” – राजू शेट्टी


