Share

फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ आरोपावर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले ,”यांना दाऊदने सुपारी दिली…”

Published On: 

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी काल (२४ मार्च) विधानसभेत एका नव्या पेनड्राईव्हचा उल्लेख करत मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर गंभीर आरोप केले. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

इसाक बागवान यांना महाराष्ट्र ओळखतो. तुम्ही कुणावर काहीही आरोप करून पोलीस दलाचे मनोबल खच्ची करू नका. लोकांच्या घरात शिरू नका. तुम्हालाही घरं आहेत. बागवान यांच्याविषयी मी अनेकदा लिखाण केलं आहे. त्यांचं पुस्तक आलं आहे. २६\११ च्या हल्ल्यात त्यांनी जिवाची बाजी लावून इस्त्रायली मुलाचा जीव वाचवला. त्यासाठी इस्त्रायलच्या सरकारने देखील त्यांचं कौतुक केलं आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच तुम्ही आमच्याच अधिकाऱ्यांचे ज्या प्रकारे खच्चीकरण करताय, मला वाटतं यांना दाऊदने सुपारी दिलीये,पाकिस्तानने सुपारी दिली आहे की, हे सगळं खच्चीकरण करा. अल कायदाचा अजेंडा हाच होता. काही राजकीय लोकांना हाताशी धरायचं, त्यांना सुपारी द्यायची आणि देशाचं, राज्याचं प्रशासन याला सुरुंग लावायचा.तोच हे लोक राबवतायत असं मला दिसतं. असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केली असून त्यांचे बंधू नासीर बागवान यांचं एक स्टिंग ऑपरेशन पेनड्राईव्हमध्ये असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच संजय राऊत यांनी आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू खाटकन, असा इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

“हा खर्च कुणाच्या सांगण्यावरून?”, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ घोषणेवर संदीप देशपांडेंचा सवाल

“तुमचा जो महाराष्ट्रद्रोही आत्मा आहे, तो शांत करा” , राऊतांचा फडणवीसांना सल्ला

CSK vs KKR : कधी, कुठे, केव्हा पाहता येणार IPL 2022चा पहिला सामना? वाचा एका क्लिकवर!

यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

माढ्यात गाईने दिला एकाच वेळी दोन वासरांना जन्म!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!