वाशिमः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आघाड्यांबाबद थेट इशारा दिला आहे. राजू शेट्टी म्हणाले, भाजप काळात सदाभाऊ खोत आणि आता महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांच्या वर्तनामुळे अतिशय दुःखी असून यापुढे आघाड्यांमध्ये सहभागी व्हायचं की नाही, याचा निर्णय घ्यावा लागेल.
तसेच, आम्ही काही विशिष्ट हेतूनं काही अटींवर आघाड्यांमध्ये जात असतो. आघाडीमध्ये गेल्यानंतर जे सत्तेत येत असतात, त्यांना सत्तेची गुर्मी येते. मस्ती येते. त्यातून आमचेच कच्चे दुवे, आमचेच कच्चे मडके. त्यांच्या हाताला लागतात. असा थेट हल्लाबोल राजू शेट्टींनी केला आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेच्या कामकाजापासून दूर आहेत, त्यामुळे ही कारवाई झाली आहे. येत्या पाच तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये आघाडीत सहभागी व्हायचं की नाही, हे ठरवलं जाईल. अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
माढ्यात गाईने दिला एकाच वेळी दोन वासरांना जन्म!
‘शरीरात चुकीचं औषध टाकून मला संपवण्याचा होता डाव’, नितेश राणेंचा गंभीर आरोप
काय सांगता..! महेंद्रसिंह धोनीनंतर आणखी एक ‘स्टार’ खेळाडू सोडणार कर्णधारपद
“…मुळे आज अख्ख मंत्रिमंडळ कपडे शिवायला मॉल मध्ये जाणार”, निलेश राणेंचा मविआ नेत्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

