🕒 1 min read
Sanjay Gaikwad | बुलढाणा : शिंदे गटातील आमदारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्यांना गद्दारी शांतपणे जगू देणार नाही, असा घाणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे केला. यावर शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पलटवार केला आहे. गायकवाड यांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे. त्यांनी संजय राऊत यांना शिवीगाळ केली आहे.
संजय गायकवाड म्हणाले, “आमच्यावर गद्दारीचा आरोप लागणार नाही. तर क्रांतीचा उठाव केल्याचा अभिमान पुढच्या पिढीवर लागणार आहे. मादxxx संजय राऊत तू याच्यानंतर अशी भाषा वापरू नको. जनतेला आमचा निर्णय मान्य आहे. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जी हातमिळवणी केली, ती जनतेला मान्य नाही. आम्हाला शिवसेना-भाजप म्हणून लोकांनी निवडूण दिले होते. आम्ही दाखवून देऊ आमच्या किती जागा महाराष्ट्रात येणार, तू तुझा पक्ष किती भूईसफाट करतो ते”.
काय म्हणाले होते संजय राऊत-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घणाघात केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री शिंदे-भाजप सरकारच्या तोंडावर थुंकत आहेत. कर्नाटकने जत ला सोडलेल्या पाण्याब बुडून मरा, असे राऊत म्हणाले. मोदींना रावण म्हटल्यावर गुजरातचा अपमान होतो. मग शिवरायांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यायला पाहीजे. स्वाभीमान असेल तर जलसमाधी घ्यावी. ज्या स्वाभीमानाच्या मुद्द्यांवर तुम्ही शिवसेना सोडली, आता तो स्वाभीमान कुठे गेला. कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुंकतो आहे.”
“यांच्या (शिंदे गटातील आमदार) कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. दिवार चित्रपटात अमिताभच्या हातावर होते, मेरा बाप चोर है. तशे यांचे नातेवाईक, यांचे पोर, यांच्या बायका, हे म्हणतील, लोक म्हणतील हे गद्दार आहेत. यांच्या कपाळावर शिक्का गद्दारीचा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्यांना गद्दारी शांतपणे जगू देणार नाही,” असे संजय राऊत म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज अपमान सुरु आहे. तुमही क्रांती कुठ आहे? क्रांतीची वांती झाली का?. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मला आदर आहे. गुजरातच्या एका प्रचारसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाअर्जून खर्गे यांनी भाषणाच्या ओघात नरेंद्र मोदी हे शंभर तोंडाचे रावण आहेत का?. त्यावर नरेंद्र मोदी म्हणाले हा माझा अपमान नसून गुजरातचा अपमान आहे. गुजरातच्या सुपूत्राता अपमान आहे. पण महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान होऊन भाजप आणि शिंदे गट गप्प बसला आहे. छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?. भाजपच्या विचारातील हा फरक समजून घ्यायला हवा, असे संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- MNS | “मातोश्री-2 कशी उभारली?”, मनसेच्या ‘या’ नेत्याच्या सवालाने खळबळ
- Sanjay Raut | “शिंदे गटात लवकरच स्फोट होईल”; संजय राऊत असं का म्हणाले?
- Sanjay Raut | “कर्नाटकचा मुख्यमंत्री शिंदे-भाजप सरकारच्या तोंडावर थुंकतोय” ; संजय राऊत यांचा घणाघात
- Sanjay Raut | “मोदींना रावण म्हंटल्यावर गुजरातचा अपमान होतोय तर…”, संजय राऊत भडकले
- Vijay Hazare Trophy 2022 | पुण्याचा स्टार चमकला, विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये ऋतुराजचे शानदार शतक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
