🕒 1 min read
Sushma Andhare | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे ओळखल्या जातात. शिवसेनेच्या ठाकरे गटाची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. या सभांमधून सुषमा अंधारे (Sushma Andhare) शिंदे गट आणि भाजपचा समाचार घेत आहेत. अशातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी एक कविता त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच ठाकरे गट, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“अंधारे बाई तर कहरच करतात..निष्पापांच्या घरावर डल्ला मारणाऱ्या रौताला गुन्ह्यात अटक झाल्यावर त्याच्या आईची तुलना जिजाऊशी करतात..यात शिवरायांचा अपमान नाही?” असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अंधारे बाई तर कहरच करतात
निष्पापांच्या घरावर डल्ला मारणाऱ्या रौताला गुन्ह्यात अटक झाल्यावर
त्याच्या आईची तुलना
जिजाऊशी करतात
यात शिवरायांचा अपमान नाही?हजारो हिंदू यमसदनी धाडले त्याच टिपू सुलतानाचे नाव यांनी पालिकेच्या मैदानाला दिले
यात शिवरायांचा अपमान नाही?@DrSEShinde— Naresh Mhaske (@nareshmhaske) December 2, 2022
दरम्यान, या ट्वीट्समधून संजय राऊतांनाही म्हस्केंनी टोला लगावला आहे. “उद्धव ठाकरेंचा एक पोपट राऊत..दम तर तसा काहीच नाही भाऊत. पण मागतो पुरावे शिवरायांच्या वंशजांना..सिद्ध करा म्हणतो तुमच्या रक्तातल्या शिवाजींना..यात शिवरायांचा अपमान नाही? औरंग्याच्या कबरीवर वाहिली फुले, कबरीला त्या नराधमाच्या संरक्षण दिले..यात शिवरायांचा अपमान नाही?”, असाही सवाल म्हस्केंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- NCP on Tanaji Sawant | आरोग्य मंत्र्यांना त्यांचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसे सांभाळणार ; राष्ट्रवादीचा सवाल
- Sambhajiraje Bhosale | उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता संभाजीराजे भोसले राज्यपालांवर संतापले, म्हणाले…
- Udayanraje Bhosale | “तुमच्या आई-वडिलांना कोणी बोललं तर…”; ‘त्या’ प्रकरणावरून उदयनराजे संतापले
- Sanjay Gaikwad | “मादxxx” ; संजय गायकवाडांची जीभ घसरली, संजय राऊतांना थेट शिवीगाळ
- MNS | “मातोश्री-2 कशी उभारली?”, मनसेच्या ‘या’ नेत्याच्या सवालाने खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
