🕒 1 min read
Udayanraje Bhosale | सातारा : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संताप व्यक्त केला आहे.
उदयनराजे म्हणाले, “असं वाटतंय तलवार घेऊन एक-एकाची मुंडकी छाटून टाकावीत.” तुमच्या आई-वडिलांना कोणी बोललं तर तुम्ही सहन केलं असतं का?, असा संतप्त सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. शिवाजी महाराज नसते तर तुमचे आई-वडीलही नसते असे उदयनराजे म्हणालेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्यावर सगळे शांत बसले असले तरी मी शांत बसू शकत नाही. मी एक शिवभक्त आहे आणि त्या घराण्यात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करू शकत नाही असं ते म्हणाले. वेगवेगळ्या पक्ष, संघटना, विचारवंत असे सर्वच जण प्रथम महाराजांचे नाव घेतात. त्यांच्या कार्याला महाराजांचेच विचार दिशा देतात. अशा महापुरुषांच्या विचारांची तोडमोड करण्याचे स्वातंत्र्य या लोकांना कोणी दिलं? असा सवालही त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले, “लोकं कोडगी झाली आहेत. सोईप्रमाणे होणारा वापर हे चालणार नाही. मी लढणारा आहे, मी रडणारा नाही.” मी आज रायगडला जाणार आहे. उड्या शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी जाऊन माझी भावना व्यक्त करणार आहे. त्यावेळी तिथं सगळंच बोलतो, असा इशारा देखील उदयनराजे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Gaikwad | “मादxxx” ; संजय गायकवाडांची जीभ घसरली, संजय राऊतांना थेट शिवीगाळ
- MNS | “मातोश्री-2 कशी उभारली?”, मनसेच्या ‘या’ नेत्याच्या सवालाने खळबळ
- Sanjay Raut | “शिंदे गटात लवकरच स्फोट होईल”; संजय राऊत असं का म्हणाले?
- Sanjay Raut | “कर्नाटकचा मुख्यमंत्री शिंदे-भाजप सरकारच्या तोंडावर थुंकतोय” ; संजय राऊत यांचा घणाघात
- Sanjay Raut | “मोदींना रावण म्हंटल्यावर गुजरातचा अपमान होतोय तर…”, संजय राऊत भडकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
