Share

Sanjay Raut : भाजपला माझ्यावर बोलण्यासाठी ४० नवीन भोंगे मिळाले – संजय राऊत

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी राऊत यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांसह भाजपवर निशाणा साधला. ‘भाजपाने माझ्यावरचं बोलणं थांबवलं आहे, त्यांना आता ४० नवीन भोंगे मिळाले आहेत’ अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून बंडखोर आमदारांकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. अनेक आमदारांनी तर या बंडाचे मुख्य कारण हे संजय राऊत यांनाच मानले आहे. बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांचाही जोरदार विरोध केला आहे.

‘शिवसेना ही शिवसैनिकांची असून धनुष्यबाण हा शिवसेनेकडेच राहील, असे राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार बंडाचे कारण तुम्हाला सांगत आहेत तसेच तुमच्यामुळे शिवसेना संपत असल्याची बोलत आहेत असे विचारले असता असता संजय राऊत म्हणाले की, “भाजपाने माझ्यावरचं बोलणं थांबवलं आहे, त्यांना आता ४० नवीन भोंगे मिळाले आहेत. त्यांच्या माध्यमातून ते बोलत आहेत. आम्ही शिवसेनेसाठी काय केलं हे महाराष्ट्र जाणतो”. असे वक्तव्य यावेळी संजय राऊत यांनी केले.

पुढे ते बोलताना म्हणाले की,“कारण एकच आहे ते म्हणजे भाजपाला शिवसेना फोडायची नाही तर संपवायची आहे. जोपर्यंत शिवसेना संपत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचं स्वप्न पूर्ण करता येणार नाही. जोपर्यंत शिवसेना संपवली जात नाही तोपर्यंत मुंबई स्वतंत्र करता येणार नाही. म्हणून शिवसेना संपवायची आहे”.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!