Sanjay Rathod । मुंबई : सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर ९ ऑगस्टला महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार यावेळी करण्यात आला. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच मंत्रिपदाची शपथ घेताना एकही मंत्र्याने बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही, या मुद्यांवरून विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार टीका झाल्या होत्या. यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय राठोड हे छत्रपती शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी वंदन करण्यासाठी आले होते.
यावेळी बोलताना संजय राठोड म्हणाले कि, की कॉलेज जीवनामध्ये आम्ही शिवसैनिक झालो. कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा नव्हती. बाळासाहेब ठाकरेंचे विचार मनामध्ये होते. राष्ट्रहित किंवा अन्यायाच्या विरोधात लढणे, हिंदुत्व असे त्यांचे विचार ऐकून आम्ही प्रभावित झालो. तेव्हापासून राजकारणात आलो. 80 समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही भूमिका घेऊन आम्ही काम केले. बाळासाहेबांच्या विचार आणि आशीर्वादामुळे चार-चार वेळा आमदार बनण्याची संधी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली. आज मंत्री झाल्यानंतर त्यांना वंदन करावे, म्हणून याठिकाणी आलो.
दरम्यान, याआधी शिवसेना अरविंद सावंत म्हणाले होते कि, शिवसेनेचे आमदार काल शपथविधीच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायला विसरले. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो आहोत. ज्या घराण्यानं महाराष्ट्रातील सामान्य माणसांना असमान्य केलं असं म्हणाले. तर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या कि, आम्ही हा मंत्रीमंडळ विस्तार काळजीपूर्वक बघत होतो. यावेळी कोणीही बाळासाहेब किंवा स्वत:च्या आईचे नाव घेतले नाही. तसेच यापैकी कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही घेतले नाही. ही वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Kesarkar । दीपक केसरकारांचा शरद पवारांना सल्ला, म्हणाले…
- Jalna । जालन्यात इनकम टॅक्सचा मोठा छापा, तब्बल 58 कोटी कॅशसह 32 किलो सोनं जप्त, 390 कोटीची मालमत्ता जप्त
- Shiv Sena । दिल्लीशिवाय आपले काही अडत नाही हे नितीशकुमारांनी दाखवून दिले; शिवसेनेचं टीकास्त्र
- Raosaheb Danve | महिलांना पुढील विस्तारात संधी मिळेल – रावसाहेब दानवे
- Sanjay Rathod । एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळात संधी का दिली; संजय राठोडांनीच सांगितलं यामागील कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

